स्वच्छ गाव
सुंदर गाव
१) कचरा व्यवस्थापन
२) आय.एस.ओ.मानाकन
३) कुपोषण मुक्त अंगणवाडी
४) साथ रोग नियंत्रण उपाययोजना
५) सौर दिवे , व एल.ई.डी.लाईट
६) सी.सी.टी.व्ही.कॅमेरे
७) ग्रामउत्सव
८) स्मुती उद्यान व स्मुती रुक्ष
९) सरपंच निधी
(सविस्तर पुढील पानावर वाचा.... )
१ ) नियमित हात धुण्याच्या सवई करिता सार्वजनिक ठिकाणी वाश बेसिंग ची व्यवस्था .बिना टच हंडवाश व्यवस्था.
२ ) वयोवृध्द नागरिकाना बसण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सिमेंट व लोखंडी खुर्च्याची व्यवस्था.
३ ) शानिटरी नाप्कीन डिस्पोजल मशीन सुविधा उपलब्ध.
४ ) पर्यावरण ग्राम समृद्धी करिता लोकसंखेच्या दुप्पट फळझाडे लागवड.
५) गावात स्वर्गवाशी झालेल्या प्रत्येक वक्तीच्या नावे गावातील स्मुती उद्यानात अप्तीयांच्या हस्ते रुक्ष लागवड व त्याची जोपासना करण्याचा उपक्रम.
६ ) अंगणवाडीत मुलांना बसण्यासाठी फर्निचर व्यवस्था, कुपोषण मुक्त अंगणवाडी सातत्य, अंगणवाडीत hand wash senter व बिना टच hand wash dispensar
७ ) जि.प.शाळेमध्ये hand wash senter व बिना टच hand wash dispensar मशीन रंगमंच व बोलक्या भिंती.
८ ) आरोग्य केंद्र व ग्राम पंचायत कार्यालयात hand wash dispensar मशीन
७ ) अंगणवाडी ,आरोग्य केंद्र,जि.प.शाळा ,व्यायामशाला,महत्वाचे चौक,येथे सी.सी.टी.वी.केमेरे व्यवस्था.
८ ) गावातील कचरा उचलण्यासाठी घन्टागाडी , घन कचरा व्यवस्थापन करिता कंपोस्ट खत निर्मिती.
९ ) लोकसहभागातून समाजप्रबोधन मार्गदर्शन व प्रशिक्षण .
१० ) गावातील सर्व लोकापर्यंत दवंडी,सूचना,महत्वाची माहिती पोहोचविण्या करिता पूर्ण गावात आवाज पोहोचेल असी साउंड सिस्टिम व्यवस्था.
११ ) संपर्कासाठी पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप सुविधा.
१२ ) सुरळीत पाणी पुरवठा व वेळेची बचत,निछिती करिता प्रतेक घरी प्रिंटेट पाणी पुरवठा वेळापत्रक
१३ ) सरपंचाला मिळणारी मानधना ची रक्कम सरपंच निधी म्हणून ,महत्वाच्या व अकस्मात येणाऱ्या लोकांच्या अडचणी करिता देण्याची सुविधा.
गावातील सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंडीची व्यवस्था केली असून ग्राम पंचायत कचरा गाडी च्या मध्यमाने कचरा संकलित करते . त्या कचरा ची विभागणी करून कंपोस्ट खत तयार करण्यात येते . रस्त्यावर असलेल्या शेनकुडा जमा करून गांडूळ खत निर्मिती केल्या जाते.
ग्राम पंचायत कार्यालय ला आय.एस.ओ.मानाकन प्रमाणपत्र प्राप्त झाले असून दरोरोज चे कामकाज आय एस ओ कार्यप्रणाली नुसार करण्यात येते
शासनाच्या व आरोग्य खात्याच्या सुचणे व नियमाप्रमाणे अंगणवाडीतील बालकांना दरोरोज सकस आहार देण्यात येत असून काही सुविधा कमी पडल्यास ग्राम पंचायत पूर्ण करते गरोधार मातांना सुद्धा विविध सुविधा दिल्यामुळे अंगणवाड्या नी कुपोषण मुक्तीत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
साथ रोग नियन्त्रण करिता गावामध्ये दररोज स्वच्छ व नीरजन्तुक करून पाणी पुरवठा केला जातो ,बंद व उघडी गटारे वारवार साफ केली जाते .डास नियन्त्रणकरिता फोगिंग मशीन द्रारे फोगिंग केल्या जाते.सिझन नुसार साउंड सिस्टीम द्व्रारा लोकांना माहिती दिल्या जाते.वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिला जातो.
गावात विविध ठिकाणी १२ सौर दिवे लावण्यात आलेले आहे .गावातील एकून ९० पोलवर एल ई डी लाईट बसविण्यात आलेले .त्यामुळे गावात रात्रीची प्रकाश व्यवस्था उत्तम झाली असून विजेची सुद्धा बचत झाली आहे. सन १९९९ ला एकून २० गोबर ग्यास तयार करण्यात आले ,त्यामुळे गोबर ग्यास मध्ये तालुक्यात पथम क्रमांक मिळाला होता सध्या ते सुरळीत सुरु आहे
ग्राम पंचायत मार्फत सर्व शासकीय इमारती परिसर ,शाळा ,अंगणवाडी,आरोग्य केंद्र, वाचनालय, व्यायामशाला. गावातील महत्वाचे प्रवेश रस्ते काही चौक,या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात आलेले आहे यामुळे गावात अवैध पवेश ,कचरा सांडपाणी व्यवस्थापन, गावाची सुरक्षा, शासकीय नोकरवर्ग याच्यावर नियंत्रणठेवण्यास सोयीचे झाले .
खुर्सापार गावातील नागदिवाळी हा ग्रामउत्सव पंचक्रोशीत नावाजलेला आहे.सर्व धर्म ,पंथ जाती या उत्सवात सहभागी होतात .दिवाळी सन झाल्यावर एक महिन्या नंतर नागदीवाळी येते याच्या पंचमीला हा ग्राम उत्सव दोन दिवसाचा असतो या दिवशी गावातील नोकरी निमित्त ,व्यवसायानिमित्त अन्य गावी,अन्य जिल्यात,अन्य राज्यात, अन्य देशात स्थायी झालेले प्रतेक व्यक्ती ,गावातील लग्न झालेल्या बाहेरगावी दिलेल्या मुली अन्य नातेवाईक मंडळी गावामध्ये कम्शेलराज महाराज मंदिरात पूजा करायला व महाआरतीस प्रामुखणे येतात,गावातील सर्व जाती धर्म यांची पूर्ण घरे पाहुण्यांनी भरगच्च भरलेली असतात .त्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी होतात व सामाजिक आपुलकी या निमित्य टिकून राहते.या दोन दिवसात देवस्थान कमेटी व ग्राम पंचायत विविध सांकृतिक,सामाजिक लोकजागरण मनोरंजनाची कार्यक्रम आयोजित करते . विशेस्था या दोन दिवसात तलाठी कार्यालयाचा सेतसारा व ग्राम पंचायतीचा कर मोठ्या प्रमाणात वसूल होते .
खुर्सापार गावातील निसर्गरम्य व्य्कुनठ्धाम ची (स्मशानभूमी ) एक स्मुतीस्थळ / स्मुती उद्यान म्हणून ओळख आहे .गावातील लोक सकाळ व सायंकाळी येथे फिरायला जातात .जवळच टेकडी तलाव, जंगल उद्यानात सुंदर फुलांची झाडे ,बसण्यास बाके,वटटे ,मोठे वृक्ष हिरवागार परिसर या स्थळावर अंत्यविधी झालेल्या व्यक्ती नावाने एक वृक्ष वारसदार यांच्या हाताने लावल्या जाते. त्या वृक्षाला मूत्यू झालेल्या वक्ती चे नाव देण्यात येते व त्याचे संगोपन केल्या जाते.
२६ जानेवारी २०१८ पासून मा.सरपंच सुधीरजी गोतमारे यांनी आपले सरपंचाला मिळणारे संपूर्ण मानधन सरपंच निधी या नावाने आपत्कालीन स्थिती व गरजू लोकासाठी खर्च करायचा असे ठरविले गरजू लोकांना व अकस्मात आलेल्या अडचणीला तात्काळ प्राथमिक आधार व्हावा हा उद्देश ठेऊन सरपंच निधी कामिटी ची स्थापना करण्यात आली सरपंच,उप सरपंच ,पोलीस पाटील,ग्रामसेवक,आरोग्यसेवक,मुखाद्यापक अंगणवाडी सेविका ,अशा वर्कर,सामाजिक संघटना प्रतिनिधी,धर्मदाय संथा प्रतिनिधी तंटा मुक्त कमेटी प्रतिनिधी क्रीडा व युवक प्रतिनिधी असे कमिटी चे सदश असून त्या त्या सेत्रातील गरजू वक्तीची शिफारस सदक्षनी केली तर नगदी स्वरुपात तात्काळ मदत या निधीच्या माध्यमाने दिली जाते. (यामध्ये प्रामुक्याने दवाख्यान्यात जाण्यासाठी वाहन व्यवस्था खर्च,शाळेतील विद्यार्थांना गणवेश,पुस्तके ,स्पर्धा परीक्षा पुस्तके खरेदी,असहाय मुले व वूद्ध लोकांना आरोग्य व नगदी सहकार्य .याव्यतिरिक्त अकस्मात आलेला संकटग्रस्थ कुटुंबाना मदत )