स्वच्छ गाव
सुंदर गाव
खुर्सापार हे गाव नागपूर अमरावती महामार्गावर अमरावतीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर नागपूर पासून ६० कि.मी.अंतरावर आहे.गावाची एकून लोकसंख्या १४८७ असून पुरुष ७४८ व स्त्री ७३९ आहे .गावाचे एकून मौजा क्षेत्रफळ658 हेक्टर एवढे असून,यापैकी बागायती जमिनीत संत्र,मोसंबी,खरीप हंगामात सोयाबीन,कापूस ,तूर तर रब्बी हंगामात चना व गहू हे मुख्य पिके शेतकरी घेतात.बहुतांश क्षेत्र ओलिताखाली असून विहिरीने सिंचन केले जाते.गावाच्या सभोतालील नाल्यावर जवळ पास ३० सिमेंट ,कोल्हापुरी बंधारे असून २ पाझर तलाव आहे.
खुर्सापार हे गाव शहरापासून दूर पण जवळ असे आहे.नागपूर पासून जरी ६० कि.मी.अंतरावर असले तरी लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे नागपूर शहराशी सतत जोडलेले असते. शेतकऱ्याची व कुटुंबिक मुख्य बाजारपेठ नागपुरच आहे. गावाचा शहराशी जरी सतत संपर्क येत असला तरी विकासाच्या दृष्टीने गाव सन १९९८ पर्यंत विकासापासून खुंटलेले होते .सतत पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ या करिता काटोल तालुक्यात सर्व प्रतःम पाणी टाकर खुर्सापार या गावाला लागत होते.दुष्काळ ग्रस्थ गाव म्हणून तालुक्यात सर्वत्र परिचित होत. शासनाच्या पाणी पूरवठा संदर्भात बऱ्याच योजण्या आल्या परंतु दुरदृस्ती व नियोजन अभावी त्या कुचकामी ठरल्या. गावात व परिसरात झाडाची लागवड नव्हती व्यवस्थित रस्ते, गटारे , सुद्धा नव्हती गावातील बरेच रस्त्यात पावसाळ्यात चिखल राहायचा.गावात बरेच अतिक्रमण रस्त्या रस्त्यावर आली होती,काही संत्रा बागायतदार सोडून बाकी कुटुंबात आर्थिक समृद्धी सुद्धा नव्हती . सन १९९८ ला त्या वेळेस चे सरपंच व ग्रामपंचायत कमेटी यांनी गावाचे विकासात्मक नियोजन करून व शासनाने जाहीर केलेल्या संतगाडगेबाबा अभियान या माध्यमातून गावाचा विकास खऱ्या अर्थाने सुरु केला.ग्राम पंचायत कमेटी व त्यांचे सर्व सहकारी यांनी प्रतक्ष सहभाग घेतल्यामुळे गावातील लोकांचा स्वच्छतेकडे व विकासाकडे कल वाढत गेला.गावातील लोकांना विश्वासात घेतल्यामुळे त्यांची रुची व सहभाग गावासाठी वाढत गेला व तेव्हा पासून गावाची आर्थिक समृद्धी ,स्वछेतेची समृद्धी व दुष्काळावर कायम स्वरूपी मात करण्याची प्रक्रिया सुरु झाली.