ग्राम पंचायतची वाटचाल
खुर्सापार गावाच्या उत्तरेला निसर्ग रम्य पाझर तलाव ,टेकडी व जंगल असून दक्षिणेला नयनरम्य सात बरड टेकड्या आहे.गावाच्या १ कि.मी.दक्षिणेला राष्ट्रीय महामार्ग क्र.६ असून पूर्व व पशिमेला संत्राची बागायती शेती आहे.नागपूर चा संत्रा जसा देशात प्रसिध्द आहे.तसा नागपूर जिल्हात खुर्सापार चं संत्राची प्रसिद्ध होती .टिकाऊ व गोड रसदार संत्रा फळे हे खुर्सापार गावाचे वैशिष्टे होती. ग्रामदेवतेचा उत्सव (नागदिवाळी)हे सुद्धा प्रामुख्याने खुर्सापार ची वैशिष्टे आहे.या दिवशी खुर्सापार गावातून काना-कोपऱ्यात गेलेला व्यक्ती,लग्न झालेल्या मुली सुद्धा गावात ग्रामदेवते च्या उत्सवात सहभागी होतात.गावात निसर्ग रम्य ठिकाणी भवानी मातेचे पौरोणीक मंदिर आहे.
गाव राजकीय दृष्ट्या सुद्धा आघाडीवर आहे. एवढे सर्व असून सुद्धा त्यावेळेस गावविकासासा कडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष नव्हते .गावात पक्के रस्ते,पक्के गटारे,रुक्षरोपण व स्वच्छता पाहिज्या त्या प्रमाणात नव्हती. सन १९९८ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकोडोजी महाराज स्वच्छ गाव स्पर्धा या शासनाच्या उपक्रमाची दखल घेत सन १९९८ पासून गावाच्या विकासाची खऱ्या अर्थाने वाटचाल सुरु झाली. त्यावेळचे सरपंच ग्रामपंचायत कमेटी त्यांचे सर्व सहकारी ,पंचायत समिती चे अधिकारी यांच्या प्रयत्ताने लोकांना विश्वासात घेऊन गावकरी मंडळी यांना मार्गदर्शन करून त्यांना स्वच्छतेचे व विकासाचे खरे महत्व अंगी रुजू लागले.
सर्व प्रथम गावाचा दुष्काळ लक्षात घेता जलसंधारण ची मोठी कामे हाती घेऊन गावातील प्रत्येक नाल्यावर बंधाऱ्याची साखळी निर्माण करण्यात आली.सालई शिवारात ३० हेक्टर मध्ये पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली व तेथून गावाच्या पिण्याच्या पाण्याची स्वजलधारा योजने अंतर्गत विहीर घेऊन गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या कायम स्वरूपी सोडविण्यात आली. बंधाऱ्याच्या साखळीमुळे शेतकऱ्याची सुद्धा विहिरीच्या पातळ्या वाढल्या .जलसंधारणचे हे काम इतक्या उत्कृष्ठ प्रमाणात झाले कि महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातून जलसंधारणाच्या कामासाठी ३ रा क्रमांक खुर्सापार ला दिला ,व त्यावेळसचे राज्यपाल यांनी खुर्सापार येथे जलसंधारण कामाचा पाहणी दौरा आयोजित केलेला होता.(दौऱ्याच्या तारखेला सतत पाऊस असल्यामुळे त्यांना नागपूर विमानतळावरून मा.राज्यपाल महोदय यांना वापस जावे लागले.)
सन १९९९ मध्ये गावाच्या विकासाचे नियोजन करून गावातील सर्व मातीचे रस्ते डांबरीकरण करण्यात आले.सोबतच रस्त्याच्या कडेला नाल्या रुक्षरोपण करून गावातील रस्त्यावर आलेली जवळ पास ८० अवैध अतिक्रमणे सामंजस्याने हटविण्यात आली व ४० लोकांजवळून रस्त्ये व नाल्या सरळ करण्या करिता जागा दान घेण्यात आल्या. ग्रामपंचायत कार्यालय,व्यायाम शाळा ,वाचनालय,आरोग्य उपकेंद्र,अंगणवाडी, यांच्या पक्क्या इमारती व मंदिरा जवळ सांकृतिक भवन त्या वेळचे आमदार,खासदार,राज्यसभेचे खासदार यांच्या सहकार्याने करण्यात आले.याच काळात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २००१ मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला व खुर्सापार ग्रामपंचायत जिल्ह्याच्या स्पर्धेत उतरली ,२००३ पासून पुन्हा गाव विकासाची गती मंदावली बाकी गाव सारखी याही गावची स्थिती झाली स्वच्छता व विकासाचे सातत्य टिकून राहिले नाही शासनाच्या स्थरावर जि कामे होती ती कामे सुरु राहिली .ग्राम पंचायत चा सार्वजनिक कामापेक्षा वैयक्तीक कामावर जास्त कल वाढला गेला,व सार्वजनिक विकासावर दुर्लक्ष झाले.
आता सन २०१८ पासून पुन्हा गावाचा व तीर्थक्षेत्र व पर्यटन या समंधी विकास आराखडा नव्याने सुरु करून स्वच्छता ,वृक्ष लागवड, पाणी नियोजन,मुलांचे शिक्षण,महिला व बालविकास, आरोग्य,शेती विकास,बंद गटारे(भूमिगत नाल्या),सौर उर्जा, रेन वाटर हार्वेस्टिंग,जलसंधारण,LED लाईट, विविध प्रशिक्षण ,मार्गदर्शन,बालउद्यान या सार्वजनिक कामा कडे विशेष लक्ष देऊन त्या समंधी झपाट्याने कामे सुरु झाले .ग्रामविकासाचे नाविन्य पूर्ण उपक्रम राबून ग्रामपंचायतीचे व लोकांचे ग्राम विकासाचे पक्के नाते जोडण्याचा प्रयत्न यशश्वी होऊ लागला.व त्यात मोठ्या प्रमाणात यश येऊ लागले.पुन्हा सन २०१८ चा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये तालुकातून प्रथम क्रमांकाचे १ लाख रुपयाचे पारितोषिक मिळाले
आमची शाळा व आमची अंगणवाडी
खुर्सापार गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा असून विद्यार्थांना इयता ७ वि पर्यंत गावातच शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.शाळेला भौतिक कामासाठी कमी पडलेला निधी व कामे ग्रामपंचायत मार्फत पूर्ण केला जाते. गावाच्या शाळेत सुसज्य व रंग-रंगोटी केलेल्या वर्ग खोल्या परिसरात बोलक्या भिंती,चालता बोलता बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम ,मुला व मुलीचे स्वतंत्र शौचालय व मुत्रीघर ,हांडवाश सेंटर ,पाण्याची टाकी,शुध्द पिण्याचे पाणी ,सांकृतिक कार्यक्रमा करिता आकर्षित रंगमंच,स्वतंत्र वाचनालय,खेळण्याचे मैदान व खेळण्याचे साहित्य,मैदानात सभोवताल बसण्याची व्यवस्था आहे.शिक्षणासाठी डिजिटल व्यवस्था उपलब्ध आहे.
गावात लहान बालकासाठी दोन अंगणवाड्या असून दोन्ही इमारती रंग-रंगोटी चित्रे शाररीक व बौद्धिक खेळणे,संपूर्ण अंगणवाडी डिजिटल आहे.बालकांना खेळण्याचा सुसज्य परिसर आहे.हांडवाश सेंटर,शौचालय व मुत्रीघर,स्वयपाक खोली सुसज्य असून बालकांना व गरोदर मातांना शासना तर्फे मिळणारा सकस आहार नियमित देण्यात येत.बालकांसाठी भौतिक व वैयक्तिक काही सुविधा कमी पडल्यास त्याची व्यवस्था ग्रामपंचायत मार्फत केली जाते.
आमचे आरोग्य उपकेंद्र
गावाच्या मध्यभागी आरोग्य उपकेंद्राची सुसज्य व नवीन इमारत असून त्यामध्ये डीलेवरी रूम , शौचालय ,आरोग्य तपासणी रूम ,औषधी व साहित्य रूम,आरोग्य तपासणी साहित्य ,आरोग्यसेवक/सेविका करिता राहण्याची सुसज्य व्यवस्थाआहे. आरोग्य सेवक व सेविका कायमस्वरूपी आहे.गावा सभोवतालिल सर्व साधारण व बहुतांश बाळतपणे दवाखान्यातच होते.
आमचे बौद्धिक व शारीरीक केंद्र
खुर्सापार गावात सन २००० ला व्यायामशाळेची सुसज्य व मोठी इमारत बांधण्यात आली.त्याच बरोबर सन २००१ मध्ये वाचनालयाची स्वतंत्र इमारत तयार करण्यात आली .टप्या टप्याने त्यात लोक वर्गणीतून व दान स्वरुपात व काही ग्रामपंचायत च्या माध्यमातून साहित्य घेण्यात आले.याचाच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम म्हणून गावातील काही युवक पोलीस व स्वरक्षण दलामध्ये रुजू झाले.
बचत गट व शेतकरी विकास
गावामध्ये १२ बचत गट असून विविध बचत गटाने बँकेच्या माध्यमाने उपग्रेट होऊन वेगवेगळे उद्योग सुरु केले .बऱ्याच शेतकरी गटाला शासना तर्फे मार्ग दर्शन प्रशिक्षण व अभ्यास दौर्याच्य माध्यमाने प्रशिक्षण देण्यात आले.कृषी विभागाच्या आत्मा च्या माध्यमाने जैविक शेतीला गावातील बऱ्याच शेतकऱ्याला प्रोत्साहित करण्यात आले व जैविक शेती करणे सुरु आहे.गावातील शेतीमध्ये कापूस,सोयाबीन,तूर,गहू,हे पिक मुक्य असून मालाची गुणवत्ता व उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागामार्फत ,गावातील प्रशिक्षित व अनुभवी शेतकरी यांच्या माध्यमाने पिक लागवड ,बाजारपेठ यासबंधी बाकी शेतकरीयांना मार्गदर्शन केल्या जाते. शेतकरी विकासामध्ये बरेच शेतकरी संत्रा,टमाटर लागवडीत अग्रेसर असून बरीच आर्थिक प्रगती झालेली आहे.
पिण्याचे पाणी
खुर्सापार गावामध्ये पाणी पुरवठा करणऱ्या दोन योजना आहे १) सन १९९८ मध्ये खुर्सापार पाझर तलावाच्या सेजारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा विहीर तयार केली तेथून गावातील जलकुंभात पाणी आणल्या जाते. उन्हाळात पाणी कमी पडत असल्याने २)- पूरक पाणी पुरवठा व्यवस्था करिता सन २००१ मध्ये स्वजलधारा योजने अंतर्गत सालई परिसरातील तलाव्याच्या बाजूला पाणी पुरवठा विहीर घेऊन त्याद्रारे गावातील जलकुंभात पाणी आणल्या जाते. या दोन्ही योजना सम्पूर्णपणे पाणी पूरवठा करिता यशस्वी ठरल्या आहे.गावामध्ये घरोघरी जलवाहिनी द्रारे पाणी पूरवठा करण्यात येत असून सामान्य व खास पाणीपट्टी वसूल केल्या जाते.
पर्यावरण संतुलित व समृद्ध गाव
सन १९९८ पासून जलसंधारण झालेली कामे त्यामध्ये जवळपास ३० कोल्यापुरी,सिमेंट प्लक व अन्य बंधारे ,एक नवीन ४० हेक्टार मधील पाझर तलाव,जुन्या ६० हेक्टार तलावातील गाळ काठने व तलावाचे खोलीकरण,१० प्रकारचे वेगवेगळी नाले रुंदीकरण . दर तीन वर्षांनी बंध्र्यातील गाळ काढणे यामुळे परिसरातील नैसर्गिक रित्या पाण्याची पटली वाढली.बंधाराच्या कडेला रुक्ष लागवड , गावामध्ये प्रतेक घराच्या समोर व आत वेगवेगळ्या प्रकारची मोठी झाडे लावण्यात आली व त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घ्र्रातील वक्तीवर देण्यात आली त्यामुळे गावात मोठी रुक्ष तयार झालेले आहे .सार्वजनिक ठिकाणी गावाबाहेरील रस्त्याच्या कडेला ग्राम पंचायतीने रुक्ष लागवड व संवर्धन केलेली आहे .गावाच्या सभोवताली जवळपास ३००० झाडाची लागवड व संवर्धन करण्यात आले .त्यामुळे पर्यावरण संतुलित समृद्ध गाव हि संकल्पना यशस्वी पार पडत आहे.
उपलब्ध सेवा
पाणी पुरवठा, कचरा संकलन, सौरदिवे, बैठक व्यवस्था, प्रशिक्षण, मार्गदर्शन, डिजिटल सुविधा,